बेळगाव तालुक्यातील शिंदोळी येथील शासकीय शाळेत ईशाना फाउंडेशनच्या वतीने एलकेजी व युकेजीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यासोबतच आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

तरुण नेते चेतन मोहन अंगडी यांच्या अध्यक्षतेखालील ईशाना फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला. या वेळी सामाजिक कार्यकर्ते वीरभद्रय्या बाबू पुजारी यांनी विद्यार्थ्यांसाठी ‘गंगा नदी’ या विषयावर आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात बोलताना चेतन अंगडी यांनी, मुलांचे भविष्य उज्ज्वल व्हावे आणि त्यांनी ध्येय ठेवून अभ्यास करावा, अशा शुभेच्छा विद्यार्थ्यांना दिल्या.

गंगा नदीचे महत्त्व, तिचे धार्मिक व भौगोलिक स्थान आणि तिच्या वापराबाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, या उद्देशाने या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे वीरभद्रय्या पुजारी यांनी सांगितले.

या कार्यक्रमास रवींद्र बेल्लद, वृषभ तिगडी, माळीगराय शहापूरकर, निंगण्णा मेकलमर्डी, गंगाराम करेगार यांच्यासह पालक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.



Recent Comments