Khanapur

खानापुरात ‘प्रजासेवा आंदोलन’ लांबणीवर; आता ९ सप्टेंबरला होणार

Share

खानापूर येथे ५ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेले ‘प्रजासेवा आंदोलन’ अपरिहार्य कारणांमुळे लांबणीवर टाकण्यात आले असून, आता हे आंदोलन ९ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे.

नागरिकांच्या समस्या आणि तक्रारींचे थेट निवारण करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाची नवीन तारीख व वेळ प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.

कर्नाटक सरकारच्या निर्देशानुसार खानापूर तालुक्यातील नागरिकांच्या विविध अडचणी आणि तक्रारी सोडवण्यासाठी ‘प्रजासेवा आंदोलन’ हाती घेण्यात आले आहे. पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार ५ सप्टेंबर रोजी होणारी ही बैठक आता ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता खानापूर येथील लोकमान्य भवनात होईल.

या महत्त्वपूर्ण सभेच्या अध्यक्षस्थानी बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी असणार आहेत. शासनाच्या या लोककल्याणकारी उपक्रमात तालुक्यातील नागरिकांनी आपल्या समस्या व गारऱ्हाणी थेट प्रशासनासमोर मांडून त्यावर तोडगा काढून घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Tags: