Belagavi

बेळगाव महापालिकेकडून थकित कर वसुलीसाठी कडक पावले

Share

बेळगाव महापालिकेचे उत्पन्न वाढवून विकासकामांना गती देण्यासाठी थकित कर वसुलीसाठी कडक पावले उचलण्यात येत असून, पहिल्या टप्प्यात एक लाख रुपयांपेक्षा जास्त कर थकबाकी असलेल्यांना नोटीस बजावण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी दिली.

गुरुवारी बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी कर वसुलीचे ठरवून दिलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी महसूल शाखेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अधिक तत्परतेने काम करण्याचे निर्देश दिले.

दुसऱ्या टप्प्यात ५०००० रुपयांपेक्षा जास्त कर थकबाकी असणाऱ्यांना नोटीस पाठवली जाणार आहे. तसेच कर वसुली अधिकारी आणि महसूल निरीक्षकांनी प्रभागांमध्येच उपस्थित राहून वसुलीला वेग द्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रभागांमध्ये विशेष पथके स्थापन करून प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन थकित कर वसुलीची मोहीम तीव्र करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

Tags: