खानापूर येथील शासकीय पदवीपूर्व महाविद्यालयात ४१ व्या नेत्रदान पंधरवड्यानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात रोपट्याला पाणी घालून नेत्रदानाचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांमध्ये प्रभावी संदेश देण्यात आला.


खानापूर येथील शासकीय पदवीपूर्व महाविद्यालयात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश किवडसन्नवर यांनी रोपट्याला पाणी घालून ४१ व्या नेत्रदान पंधरवड्याचे सांकेतिक उद्घाटन केले. पर्यावरण रक्षणाप्रमाणेच नेत्रदान हे अंध व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारे अत्यंत मूल्यवान योगदान आहे असे डॉ. महेश किवडसन्नवर यांनी म्हटले.


या कार्यक्रमास नेत्रतज्ज्ञ डॉ. संतोष हसरगुंडी आणि नेत्राधिकारी भीमनगौडा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते. मरणोत्तर नेत्रदानाबाबत समाजात पसरलेले गैरसमज दूर करून व्यापक प्रबोधन घडवून आणण्याचा विचार या वेळी मांडण्यात आला.


Recent Comments