Khanapur

नंदगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता समितीची बैठक

Share

खानापूर तालुक्यातील नंदगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंदिगवाड गावात आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक पार पडली. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नियमांचे पालन करून शांततेत आणि शिस्तीत सण साजरा करावा, असे आवाहन स्थानिक पोलीस निरीक्षकांनी केले.

गंदिगवाड येथील लक्ष्मी मंदिरात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत नंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविकुमार धर्मट्टी बोलत होते. नागरिकांनी शासकीय आदेशांनुसार निर्धारित प्रक्रियेद्वारे रीतसर परवानगी मिळवूनच उत्सव साजरा करावा असे रविकुमार धर्मट्टी यांनी म्हटले. सणाच्या काळात कोणत्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेऊन सौहार्दपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा करावा अशी प्रतिक्रिया रविकुमार धर्मट्टी यांनी दिली.

या बैठकीला गंदिगवाड आणि परिसरातील गावांमधील नागरिक, ज्येष्ठ आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीस हवालदार नीलकंठ चंदरगी यांच्यासह पोलीस खात्यातील कर्मचारी उपस्थित होते. शांततापूर्ण वातावरणात उत्सव पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्याची ग्वाही दिली.

Tags: