बेळगावचे पोलीस आयुक्त म्हणून १५ महिने यशस्वी सेवा बजावल्यानंतर हुबळी-धारवाड येथे बदली झालेले भूषण बोरसे यांना पोलीस दल आणि नागरिकांच्या वतीने अनोख्या पद्धतीने निरोप देण्यात आला. खुल्या वाहनातून मिरवणूक काढून त्यांना मानवंदना देण्यात आली.


बेळगाव शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यात आणि गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यात भूषण बोरसे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या निरोप समारंभात पोलीस दलाच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.


भूषण बोरसे यांनी शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कठोर पावले उचलली, असे प्रतिपादन पोलीस उपआयुक्त नारायण बरमणी यांनी केले. बोरसे हे एकही सुट्टी न घेता अविरत काम करणारे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, अशी प्रतिक्रिया पोलीस उपआयुक्त निरंजन राज अरस यांनी दिली.

अंमली पदार्थविरोधी मोहीम, वाहतूक नियंत्रण आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी नागरिक आणि पोलीस पथकाने मोलाचे सहकार्य केले, असे सांगत मावळते आयुक्त भूषण बोरसे यांनी लोकप्रतिनिधी, नागरिक आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
समारंभाच्या शेवटी पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देऊन आणि पुष्पवृष्टी करत भूषण बोरसे यांना सन्मानाने निरोप देण्यात आला.


Recent Comments