Khanapur

मथुरा येथे काँग्रेसच्या ‘संघटन सृजन’ अभियानाला प्रारंभ: एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांचे ज्येष्ठ नेत्यांशी मंथन

Share

खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी मथुरा येथे ‘संघटन सृजन’ अभियानाचे नेतृत्व करत काँग्रेस पक्षाच्या संघटन मजबुतीकरणावर भर दिला आहे. छत्ता ब्लॉक काँग्रेस समितीच्या बैठकीत त्यांनी ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या निष्ठेचे कौतुक केले.

मथुरा जिल्ह्यातील छत्ता ब्लॉकमध्ये आयोजित काँग्रेस संघटन सृजन अभियानाच्या बैठकीत एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी सहभाग घेऊन पक्षाच्या तत्त्वज्ञानावर चर्चा केली. या वेळी त्यांनी ८७ वर्षांच्या एका ज्येष्ठ नेत्याची भेट घेऊन मार्गदर्शन घेतले. आजही प्रत्यक्ष मैदानात उतरून प्रबोधन करणाऱ्या अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवून पक्षाच्या संघटनेत नवीन चैतन्य निर्माण केले जात असल्याचे डॉ. अंजली निंबाळकर यांनी सांगितले.

Tags: