Belagavi

खडेबाजारातील कामामुळे गणपत गल्लीत वाहतुकीचा खोळंबा

Share

खडेबाजार आणि गणपत गल्ली कॉर्नर परिसरात एल अँड टीच्या कामामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. सणासुदीच्या काळात रस्त्याचे काम सुरू असल्याने खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांसह बाहेरगावच्या ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

खडेबाजारातील गणपत गल्ली कॉर्नरजवळ एल अँड टीच्या कामासाठी रस्त्याची एक बाजू पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. प्रमुख व्यापारी केंद्र असलेल्या या परिसरात सणासुदीच्या खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ वाढली असताना रस्त्यावर मोठा खड्डा खोदण्यात आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

वाहतूक पोलिसांची नियुक्ती नसल्याने वाहनांच्या रांगा लागत असून वाहतूक विस्कळीत होत आहे. बाहेरगावहून येणारे नागरिक आणि पादचाऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Tags: