Belagavi

येडियुरप्पा रोडवर दिवसाही पथदीप सुरू

Share

एकीकडे वीज बचतीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जात असताना, येडियुरप्पा रोडवर दिवसाही पथदीप सुरू असल्याचे दिसून आले आहे. जुने बेळगाव नाका परिसरातील १७ खांबांवरील पथदीप कालपासून सलग सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

येडियुरप्पा रोडवरील १७ खांबांवरील पथदीप दिवसा देखील सुरू राहत असल्याने विजेचा अनावश्यक वापर होत आहे. यामुळे सार्वजनिक निधीचाही विनाकारण खर्च होत असल्याची नागरिकांची नाराजी आहे. संबंधित प्रशासन आणि देखभाल कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

वीज बचतीसाठी प्रशासनाकडून जनजागृती केली जात असताना पथदीप दिवसा सुरू राहणे टाळावे, अशी नागरिकांची मागणी आहे. संबंधित यंत्रणेने पथदीपांच्या नियंत्रणाकडे लक्ष देऊन विजेचा अपव्यय रोखावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Tags: