Belagavi

आम. आसिफ सेठ यांची बुडा अध्यक्षपदी नियुक्ती

Share

बेळगाव शहर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने यासंदर्भातील आदेश काढला असून नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे.

कर्नाटक नगरविकास प्राधिकरण कायदा १९८७ मधील कलम ३(३)(ए) आणि ३(४) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून राज्य सरकारने हा निर्णय घेतला. अधिकृत अधिसूचनेनुसार, विद्यमान अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्या जागी आसिफ सेठ यांची बुडा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सरकारच्या पुढील आदेशापर्यंत आसिफ सेठ अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. नगरविकास विभागाच्या उपसचिव लता के. यांनी यासंदर्भातील माहिती दिली.

Tags: