Belagavi

बेळगावच्या बाजारपेठेत राख्यांची रंगत; रंगीबेरंगी राख्यांनी सजली दुकाने

Share

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावच्या बाजारपेठेत विविध रंग आणि आकर्षक डिझाइनच्या राख्यांची रेलचेल पाहायला मिळत आहे. पांगुळ गल्लीसह प्रमुख बाजारपेठांमध्ये राख्या खरेदी करण्यासाठी महिला आणि तरुणींची वर्दळ वाढली आहे.

रक्षाबंधन जवळ येत असल्याने बेळगावच्या बाजारपेठेत उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः पांगुळ गल्ली आणि शाहापूर सर्कल परिसरात राख्या खरेदीसाठी महिलांची आणि तरुणींची गर्दी होत आहे. विविध प्रकारच्या राख्यांनी दुकाने सजली आहेत.

यंदा लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या लाइटिंग राख्या आणि कार्टून पात्रांच्या राख्यांना मागणी आहे. पारंपरिक रुद्राक्ष राख्या, झिरकॉन आणि मोत्यांनी सजविलेल्या राख्याही ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. व्यापाऱ्यांनी विविध डिझाइनच्या नव्या राख्या विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत.

दहा रुपयांपासून राख्यांची विक्री सुरू असून, ब्रँड आणि डिझाइननुसार त्यांची किंमत पाचशे रुपयांपर्यंत आहे. महागाई असली तरी रक्षाबंधनाच्या खरेदीचा उत्साह कायम असून ग्राहक आपल्या पसंतीच्या राख्या खरेदी करत आहेत.

Tags: