जयपूर येथे आयोजित ४२ व्या राष्ट्रीय सब ज्युनियर जलतरण स्पर्धेत बेळगावच्या दिशा होंडी हिने तीन पदकांची कमाई करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करताना तिने उत्कृष्ट क्रीडाकौशल्याच्या जोरावर एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदके पटकावली आहेत.

या स्पर्धेतील ४x१०- मीटर फ्रीस्टाईल रिले प्रकारात कर्नाटक संघाकडून खेळताना दिशाने सुवर्णपदक मिळवले. याशिवाय, ५० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात २८ सेकंदांची वेळ नोंदवत आणि १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात १:०८ सेकंदांची वेळ नोंदवत तिने दोन रौप्य पदके आपल्या नावावर केली.

दिशा सध्या भुवनेश्वर येथील ‘इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स अकॅडमी’मध्ये प्रशिक्षण घेत आहे. तिला तिचे वडील राजेश, आई श्वेता, हिंद स्पोर्ट्स क्लब आणि एनआयएस प्रशिक्षक विश्वनाथ पवार यांचे मार्गदर्शन व पाठबळ लाभले आहे. तिच्या या यशामुळे बेळगावसह संपूर्ण राज्याचे नाव क्रीडा जगतात उज्ज्वल झाले आहे.
दिशाच्या या कामगिरीबद्दल क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून तिचे विशेष अभिनंदन केले जात आहे.


Recent Comments