बैलहोंगल तालुक्यातील नागणूर येथील ज्येष्ठ नागरिक बसनगौडा बसवण्णप्पा तल्लूर (८३) यांचे १७ ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार कुटुंबीयांनी डॉ. रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून बेळगावच्या केएलई जेएनएमसी महाविद्यालयाला देहदान केले.

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी मदत व्हावी, या उद्देशाने कुटुंबीयांनी हे पाऊल उचलले आहे. तल्लूर कुटुंबाच्या या निर्णयाबद्दल डॉ. रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव डॉ. महांतेश रामण्णावर यांनी आभार मानले. बसनगौडा यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि तीन मुली असा परिवार आहे.



Recent Comments