वाल्मिकी अनुसूचित जमाती विकास महामंडळातील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपकडून सुरू असलेले अहोरात्र आंदोलन सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच राहिले.

भाजपचे राज्य प्रवक्ते व वकील एम. बी. जिरली यांनी महामंडळातील १८७ कोटींपेक्षा जास्त रकमेच्या कथित गैरव्यवहाराचा निषेध केला. या प्रकरणी माजी मंत्री बी. नागेंद्र यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी केली. सरकारने तात्काळ कारवाई न केल्यास हे आंदोलन राज्यातील सर्व तालुके आणि गावांपर्यंत पोहोचवले जाईल, असा इशारा एम. बी. जिरली यांनी दिला.

माजी आमदार संजय पाटील यांनी राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. गुन्हा दाखल असतानाही नागेंद्र यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याची टीका त्यांनी केली.

भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी महामंडळाचा निधी इतरत्र वळवण्यात आल्याचा आरोप केला. संशयित मंत्र्यांचा राजीनामा न घेतल्यास आगामी काळात जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा सुभाष पाटील यांनी दिला.


Recent Comments