Belagavi

राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

Share

बंगळुरू आणि तुमकूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय मानांकन स्केटिंग स्पर्धेत बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत ९ पदकांची कमाई केली आहे.

या स्पर्धेत बेळगावच्या खेळाडूंनी ७ सुवर्ण, १ रौप्य आणि २ कांस्य अशी एकूण ९ पदके जिंकली. वैयक्तिक प्रकारात रश्मिता अंबिग आणि साईराज मेंडके यांनी प्रत्येकी २ सुवर्णपदके पटकावली. तर हिरेन राज याने १ सुवर्ण व १ कांस्य, जय ध्यान राज याने १ सुवर्ण व १ रौप्य आणि मनन अंबिग याने १ कांस्यपदक मिळवले.

केएलई संस्थेचे स्केटिंग रिंक, गुड शेफर्ड रिंक आणि शिवगंगा स्पोर्ट्स क्लब येथे प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गंगणे, योगेश कुलकर्णी, विश्वनाथ येळ्ळूरकर आणि सोहम हिंडलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी सराव केला होता. या विजेत्या खेळाडूंचे डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार श्याम घाटगे, राज घाटगे, उमेश कळकटगी, प्रसाद तेंडुलकर आणि कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनचे सचिव इंदूधर सीताराम यांनी अभिनंदन केले आहे.

Tags: