Raibag

नागपंचमीच्या दिवशीच काळाचा घाव; विषारी सर्पदंशामुळे रायबागमध्ये महिलेचा मृत्यू

Share

रायबाग शहरातील आंबेडकर नगर भागात राहणाऱ्या सत्यव्वा शिवानंद शिंगे (४३) असे मृत महिलेचे नाव आहे.

कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सत्यव्वा या नेहमीप्रमाणे सोमवारी शेतात तण काढण्याच्या कामासाठी गेल्या होत्या. काम करत असताना तिथे दबा धरून बसलेल्या विषारी सर्पने त्यांच्यावर अचानक हल्ला केला.

सर्पदंशानंतर प्रकृती खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केला, मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.

या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे सत्यव्वा यांच्या कुटुंबीयांवर व मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नागपंचमीच्या आनंदाच्या वातावरणातच काळाने घाव घातल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रायबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

Tags: