Belagavi

बेळगावात महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

Share

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त बेळगावात सामाजिक कार्यकर्ते गंगाधर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची तसेच पुतळा परिसराची स्वच्छता करून परिसर चकाचक केला.

लाल बहादूर शास्त्री यांच्या साधेपणा आणि देशसेवेचे स्मरण करत त्यांच्या ‘जय जवान, जय किसान’ या घोषणेचा पुनरुच्चार करण्यात आला. देशाच्या प्रगतीत शेतकरी व सैनिकांचे योगदान मोलाचे असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून सर्वांनी अशा सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. या मोहिमेत सुहास, रमेश, प्रेमनाथ, आर्यन, राजू, शशी आणि हेमा माने यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Tags: