goa

गोवा काँग्रेस परिवारासोबत डॉ. अंजली निंबाळकर यांनी साजरा केला स्वातंत्र्यदिन

Share

एआयसीसी सचिव आणि खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी गोवा काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला.

गोव्याच्या प्रभारी म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्या तळागाळापासून पक्ष संघटनेच्या बांधणीत सक्रिय झाल्या असून, स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी काँग्रेस नेत्यांसोबत ध्वजारोहण केले.

शांतताप्रिय गोव्यात सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटकांविरुद्ध सर्वांनी एकत्र येऊन लढा देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. अंजली निंबाळकर यांनी यावेळी केले.

याप्रसंगी त्यांनी गोवा राज्यातील तसेच संपूर्ण देशातील जनतेला स्वातंत्र्यदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Tags: