Hukkeri

हुक्केरी तालुक्यात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Share

हुक्केरी तालुक्यात ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. तालुका प्रशासनासह विविध संस्थांच्या वतीने राष्ट्रीय ध्वज फडकवून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.

पोलीस परेड मैदानावर पोलीस निरीक्षक शिवशंकर गणाचारी यांच्या हस्ते तर तालुका प्रशासकीय इमारतीच्या आवारात तहसीलदार बलराम कट्टीमनी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या प्रसंगी तहसीलदारांनी देशाच्या प्रगतीत सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन केले.

नगरपालिका, शाळा, बस स्थानक व विविध संस्थांच्या कार्यालयांमध्ये मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. एस. के. हायस्कूलच्या मैदानावर पार पडलेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात तहसीलदारांनी क्रांतीवीर संगोळ्ळी रायणा ज्योतीचे स्वागत केले.

या प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी आकर्षक संचलन, देशभक्तीपर नृत्ये व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. सोहळ्याला तालुक्यातील विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्यदिनानिमित्त तालुक्यातील सर्व शासकीय इमारतींवर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.

राजू बागुलकोट
इन न्यूज
हुक्केरी

Tags: