Khanapur

खानापुरात स्वातंत्र्यदिन उत्साहात: ध्वजारोहण आणि कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव

Share

खानापूर तालुका प्रशासनाच्या वतीने ८० वा स्वातंत्र्यदिन तहसील कार्यालयाच्या आवारात अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार विठ्ठल हलगेकर आणि तहसीलदार दुंडप्पा कोमार यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने आयोजित कार्यक्रमात आमदार विठ्ठल हलगेकर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.

तहसीलदार दुंडप्पा कोमार यांच्या हस्ते अधिकृत ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी पोलीस दलाकडून मानवंदना स्वीकारल्यानंतर उपस्थितांनी वंदे मातरमचे गायन केले.

या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला तालुक्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी, राजकीय नेते, विविध शाळांचे विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: