gokak

गोकाकमध्ये बेकायदेशीर चक्रीव्याज व्यवसाय: पिता-पुत्र अटकेत, ६.१५ लाखांची रोकड जप्त

Share

गोकाक शहरात बेकायदेशीरपणे जादा चक्रीव्याज वसुली करणाऱ्या दोन सावकारांवर गोकाक शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केएसपी ॲपद्वारे प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ही धडक कारवाई करत आरोपींच्या घरातून लाखांची रोकड आणि अनेक बेकायदेशीर कागदपत्रे जप्त केली आहेत.

गोकाक शहरात बेकायदेशीर सावकारी व चक्रीव्याजाचा धंदा चालवणारे यल्लाप्पा बिराजगोळ आणि त्यांचा मुलगा विठ्ठल यल्लाप्पा बिराजगोळ यांच्यावर गोकाक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका नागरिकाने केएसपी ॲपद्वारे दिलेल्या अर्जाच्या आधारे न्यायालयाने सर्च वॉरंट जारी केले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या घरावर छापा टाकला.

तपासणीदरम्यान घरातून ६ लाख १५ हजार रुपयांची रोकड, कोरे धनादेश, प्रॉमिसरी नोट्स आणि कोरे बाँड पेपर्स जप्त करण्यात आले. ‘कर्नाटक अतिरिक्‍त व्याज वसुली बंदी कायदा २००४’ अंतर्गत गोकाक शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवून पिता-पुत्राला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

Tags: