Belagavi

कंग्राळी खुर्द – ज्योती नगरमध्ये कचऱ्याचे साम्राज्य; नागरिक आक्रमक

Share

कंग्राळी खुर्द – ज्योती नगरमध्ये मुख्य रस्त्यावर कचऱ्याचे मोठे ढीग साचल्याने तीव्र दुर्गंधी पसरली आहे. कर भरूनही महापालिका स्वच्छता राखण्यात अपयशी ठरल्याने स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

कचऱ्यामुळे परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. त्यातच पथदीप बंद असल्याने सायंकाळी ७ नंतर महिला, बालके आणि विद्यार्थ्यांना या मार्गावरून ये-जा करताना मोठ्या भीतीचा सामना करावा लागत आहे.

महापालिकेचे अधिकारी केवळ पाहणी करून जातात, पण ठोस उपाययोजना करत नाहीत असा आरोप स्थानिक रहिवासी अरुण कालकुंद्रीकर यांनी केला आहे. प्रशासनाने तात्काळ कचरा हटवून बंद दिवे दुरुस्त करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Tags: