Athani

अथणीत लक्ष्मण सवदी यांचे जंगी स्वागत

Share

मंत्रिपद मिळाल्यानंतर शनिवारी प्रथमच अथणी शहरात आगमन झालेल्या लक्ष्मण सवदी यांचे कार्यकर्ते व समर्थकांनी जंगी स्वागत केले.

यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री लक्ष्मण सवदी म्हणाले, बेळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या इच्छेनुसार काँग्रेस वरिष्ठ व नेत्यांनी मला मंत्रिपद दिले आहे, असे वक्तव्य नूतन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी केले. मला मिळालेले मंत्रिपद अनपेक्षित नाही, समर्थकांच्या इच्छेनुसार पक्षाने ही जबाबदारी सोपवली आहे. बेळगाव हा मोठा जिल्हा असून जिल्ह्याच्या विकासासाठी विविध योजना राबवण्यावर आपला भर असेल.

आपल्या मंत्रिपदाला कोणीही विरोध केलेला नाही, असे सांगत सोमवारी आपल्याला कोणते खाते मिळेल हे स्पष्ट होईल आणि दिलेली जबाबदारी पारदर्शकपणे पार पाडण्यास आपण तयार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच आगामी काळात जिल्ह्यातील सर्व १४ विधानसभा मतदारसंघांत काँग्रेसच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याचे लक्ष्मण सवदी यांनी सांगितले.

Tags: