खानापूर तालुक्यातील लोकोळी आणि जैनकोप ग्रामस्थ तसेच वारकऱ्यांच्या वतीने श्री क्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात येत असलेल्या भक्त निवास इमारतीच्या स्लॅब कामाचा प्रारंभ करण्यात आला आहे. युवा भाजप नेते राजवर्धन अरविंद पाटील यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ झाला.

धार्मिक व सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या लोकोळी आणि जैनकोप गावातील वारकरी व ग्रामस्थांनी पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांच्या राहण्याची सोय व्हावी यासाठी हे नवीन भक्त निवास बांधण्याचा निर्णय घेतला आहे.


स्लॅब कामाचा प्रारंभ केल्यानंतर बोलताना राजवर्धन पाटील यांनी, लोकोळी आणि जैनकोपचे वारकरी व ग्रामस्थ एकत्र येऊन पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी करत असलेले हे सेवाकार्य आपल्यासारख्या तरुणांसाठी मोठी प्रेरणा असल्याचे स्पष्ट केले.




Recent Comments