Khanapur

खानापुरात बैलूर-कक्केरी रस्ता पूर्णपणे खराब; आमदार विठ्ठल हलगेकरांवर राजू तळवार आक्रमक

Share

खानापूर तालुक्यातील सुरपूर केरवाड येथील बैलूर ते कक्केरी रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. यावरून काँग्रेसचे युवा नेते राजू तळवार यांनी स्थानिक आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याविरोधात तीव्र संताप व्यक्त करत रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे.

बैलूर-कक्केरी रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना अपघाताच्या भीतीखाली प्रवास करावा लागत आहे. सध्या श्रावण महिना सुरू असून आगामी काळात प्रसिद्ध बिष्टादेवी यात्रा व अमावस्येला हजारो भाविक याच मार्गाने प्रवास करतात. अशा महत्त्वाच्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे संतप्त झालेल्या राजू तळवार यांनी लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षावर जोरदार टीका केली असून, प्रवाशांच्या सोयीसाठी रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे.

Tags: