हुक्केरी तालुक्यातील यमकनमर्डी येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला उभ्या केलेल्या कारला अचानक आग लागून वाहनाचे अंशतः नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेतून चालक सुरक्षितरीत्या बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

यमकनमर्डी परिसरात महामार्गालगत कार उभी असताना अचानक इंजिनमधून धूर निघून आगीचा भडका उडाला. घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक नागरिक व माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत कारचे अंशतः नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या प्रकरणी यमकनमर्डी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.



Recent Comments