खानापूर तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असल्याने मलप्रभा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. जुन्या पुलाजवळ नदीचा वेग आणि निसर्गरम्य दृश्य स्थानिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

खानापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मलप्रभा नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने नदी पूर्ण क्षमतेने वाहू लागली असून, खानापूर शहरातील जुन्या पुलाजवळ मलप्रभा नदीला नवे रूप प्राप्त झाले आहे.

नदीचा हा विलोभनीय देखावा पाहण्यासाठी नागरिक व स्थानिक लोक जुन्या पुलाजवळ गर्दी करत आहेत. नदी पात्रात पाण्याचा प्रवाह वेगाने वाढल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून नागरिक आणि नदीकाठच्या रहिवाशांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Recent Comments