Khanapur

स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या शुभम साखेला राष्ट्रीय कांस्य पदक

Share

चंदिगढ येथे झालेल्या खुल्या राष्ट्रीय रँकिंग स्केटिंग स्पर्धेतील ‘डाऊनहिल’ प्रकारात बेळगावच्या शुभम साखे याने उत्कृष्ट कामगिरी करत कांस्य पदक पटकावले.

बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचा खेळाडू असलेल्या शुभम साखे याने देशभरातील २०० हून अधिक स्पर्धकांमध्ये खडतर आव्हान पार करत हे यश मिळवले. शुभमने प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, विठ्ठल गंगणे व सोहम हिंडलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला होता.

त्याच्या या यशाबद्दल डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कळघटगी, प्रसाद तेंडुलकर आणि कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनचे सचिव इंदुधर सीताराम यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Tags: