खानापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे हालात्री नदीला पूर आला असून खानापूर-हेम्मडगा मार्गावरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.

खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे हालात्री नदी ओसंडून वाहत आहे. पूलावरून सुमारे तीन फूट पाणी वाहत असल्याने या मार्गावरील रस्ते वाहतूक ठप्प झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

सततच्या पावसामुळे तालुक्यातील मलप्रभा नदीच्या पाणीपातळीतही लक्षणीय वाढ झाली आहे. पूलावरून पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने वाहनधारकांनी जीवाचा धोका पत्करू नये, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत नागरिकांनी खानापूर-असोगा-मणतुर्गा-हेम्मडगा किंवा खानापूर-लोंढा-रामनगर या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे.


Recent Comments