Khanapur

कुमटा-होन्नावरमध्ये काँग्रेसचे संघटन अभियान सुरू

Share

कुमटा आणि होन्नावर ब्लॉक काँग्रेसतर्फे आयोजित ‘संघटन सिझन अभियानात’ एआयसीसी सचिव आणि खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी मार्गदर्शन केले. तळागाळापासून पक्ष मजबूत करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने एकजुटीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कुमटा-होन्नावर विधानसभा मतदारसंघाच्या कुमटा आणि होन्नावर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने हे ‘संघटन सिझन अभियान’ आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना डॉ. अंजली निंबाळकर यांनी काँग्रेसची तत्त्वे आणि विचारसरणी घरोघरी पोहोचवून तळागाळात पक्षाचा पाया अधिक भक्कम करण्याचे सांगितले.

एआयसीसी निरीक्षक रोसलिना तिर्के यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या अभियानात डॉ. निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरत संघटित प्रयत्नांची गरज अधोरेखित केली. या प्रसंगी कुमटा-होन्नावर मतदारसंघातील प्रमुख नेते, विविध घटकांचे पदाधिकारी आणि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: