Bailahongala

भरधाव कारच्या धडकेत ४८ मेंढ्या मृत्युमुखी

Share

बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यात बेळवडीजवळ कारच्या धडकेत ४८ मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात १५ हून अधिक मेंढ्या गंभीर जखमी झाल्या असून कारचालक गाडी सोडून पसार झाला आहे.

बैलहोंगलहून बेळवडीकडे जाणाऱ्या कारने रस्त्यावरून जाणाऱ्या मेंढ्यांच्या कळपाला धडक दिली. केंगाणूर येथील चंद्रप्पा हित्तलमनी आणि दोडवाड येथील बीरप्पा यांच्या या मेंढ्या होत्या. या अपघातात मेंढपाळाचे लाखोंचे नुकसान झाले असून काही गाभण मेंढ्यांचाही अंत झाला आहे.

अपघातानंतर कारचालक घटनास्थळीच गाडी सोडून पळून गेला. निष्काळजीपणामुळे झालेल्या या अपघातावर मेंढपाळ आणि नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. बैलहोंगल पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून फरार चालकाचा शोध सुरू आहे.

Tags: