स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर खानापूर तहसील कार्यालयात पूर्वतयारी बैठक पार पडली.


आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि लोकसहभागातून साजरा करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी आमदार हलगेकर यांनी सर्व शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती आणि विविध संस्थांनी राष्ट्रीय सण उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करावा असे आवाहन केले.
बैठकीत गुणवंत विद्यार्थी व माजी सैनिकांचा सन्मान, रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत जनजागृती, व्यसनमुक्ती अभियानाची प्रभावी अंमलबजावणी, “स्वच्छ आणि सुंदर खानापूर” अभियान राबविणे तसेच वाहतूक शिस्तीसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीला माजी आम. दिगंबर पाटील, विविध विभागांचे अधिकारी, पोलीस अधिकारी, स्थानिक संस्था-संघटनांचे प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.


Recent Comments