Khanapur

खानापूरमध्ये हडपद अप्पण्णा जयंती उत्साहात साजरी

Share

खानापूर येथे शिवशरण हडपद अप्पण्णा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आमदार विठ्ठलराव हळगेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात हडपद अप्पण्णांच्या सामाजिक समतेच्या विचारांचे स्मरण करण्यात आले.

खानापूर तहसीलदार कार्यालयात राष्ट्रीय सण उत्सव समितीच्या वतीने १२व्या शतकातील शिवशरण हडपद अप्पण्णा यांची जयंती आयोजित करण्यात आली. आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

यावेळी आमदार हलगेकर यांनी अप्पण्णांनी आपल्या वचनांमधून सामाजिक समानता, बंधुता आणि कायक या विचारांचा संदेश दिल्याचे सांगितले. त्यांचे विचार आजही समाजाला मार्गदर्शक ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात श्री श्री स्वामी अडवी सिद्धेश्वर आणि तहसीलदार दुंडप्पा कोमार यांनी हडपद समाजाच्या प्रगतीसाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी भाजप नेते मल्लप्पा मरीहाळ, सोमशेखर नावलगी यांच्यासह हडपद समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: