बेळगाव येथील तुरमुरी घनकचरा व्यवस्थापन केंद्राला नगरविकास मंत्री डॉ. यतींद्र सिद्धरामय्या यांनी भेट देऊन पाहणी केली. केंद्रात शंभर टक्के कचऱ्यावर प्रभावी प्रक्रिया होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

महापालिकेचे पर्यावरण अधिकारी हनुमंत कलादगी यांनी मंत्र्यांना तुरमुरी केंद्रातील कचरा व्यवस्थापन प्रक्रिया आणि कार्यपद्धतीची माहिती दिली. केंद्रातील विविध सुविधांची यावेळी पाहणी करण्यात आली.

मिश्र कचरा वेगळा करण्यासाठी अत्याधुनिक बॅलिस्टिक यंत्रणा असलेली बेळगाव महापालिका राज्यातील एकमेव महापालिका ठरली आहे. तुरमुरी केंद्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि कचरा व्यवस्थापनाच्या पद्धतीचे नगरविकास मंत्री डॉ. यतींद्र सिद्धरामय्या यांनी कौतुक केले.
बेळगाव महापालिकेने राबविलेल्या या कचरा व्यवस्थापन पद्धतीचा नमुना राज्यभर राबविण्यात येईल. तसेच कर्नाटकातील सर्व महापालिकांसाठी अशाच प्रकारची बॅलिस्टिक यंत्रे खरेदी करून उपलब्ध करून देण्यात येतील, असे यतींद्र सिद्धरामय्या यांनी सांगितले.


Recent Comments