Uncategorized

मारिहाळमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई; सहा जणांना अटक

Share

बेळगाव तालुक्यातील मारिहाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई करत सहा जणांना अटक केली.

या कारवाईत २३ हजार ८०० रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. २७ जुलै रोजी नागेश भरमशेट्टी यांच्या फार्महाऊसजवळ सार्वजनिक ठिकाणी जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार मारिहाळ पोलीस ठाण्याचे एचएसआय मंजुनाथ हुलकुंद आणि कर्मचाऱ्यांनी छापा टाकला.

या कारवाईत महांतेश बंबरगी, इस्माईल देसाई, रमेश नायक, सिद्धाप्पा भद्रशेट्टी, प्रकाश गस्ती आणि नागाप्पा बागराई या सहा जणांना घटनास्थळी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.

जुगार चालवणारा अशोक बागराई याच्यासह अर्जुन, भीमाप्पा, किरण आणि गंगाप्पा हे पाच जण कारवाईदरम्यान पसार झाले. पोलिसांनी एकूण ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

ही कारवाई करणाऱ्या मारिहाळ पोलिसांच्या पथकाचे बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांनी कौतुक केले.

Tags: