Khanapur

भारत नगर १ ल्या गल्ली पंच कमिटीची निवड पूर्ण

Share

बेळगाव येथील भारत नगर १ ल्या गल्लीच्या नवीन पंच कमिटीच्या रचनेसाठी नुकतीच एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नेबाजी सुभाष सांस्कृतिक भवनात पार पडलेल्या या बैठकीत ज्येष्ठ नेते तसेच मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे सरचिटणीस महादेव पाटील यांची सरपंचपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
बेळगाव येथील नेताजी सुभाष सांस्कृतिक भवनात आयोजित नवीन कार्यकारिणीच्या बैठकीत भारत नगर १ ल्या गल्लीच्या नवीन पंच कमिटीची अधिकृत घोषणा करण्यात आली. यात सरपंचपदी निवड झालेले महादेव पाटील यांच्यासह सचिवपदी विजय वांगणेकर आणि खजिनदारपदी प्रभाकर अष्टेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर नवीन कार्यकारी समितीचे सदस्य म्हणून संतोष कणुकले, नारायण बामणे, अनिल पाटील, किरण हुद्दार, राजू अष्टेकर, बंडू सामजी, गणेश देसूरकर आणि राजू संकण्णावर यांची निवड झाली आहे. -0-

Tags: