Khanapur

खानापूर तालुक्यातील माडीगुंजी परिसरात बिबट्याचे दर्शन

Share

खानापूर तालुक्यातील माडीगुंजी गाव आणि लगतच्या परिसरात गेल्या १५ दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

पहाटेच्या वेळी फिरण्यास जाणारे नागरिक आणि शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना बिबट्याचे थेट दर्शन घडत आहे. या बिबट्याने परिसरातील पाळीव कुत्र्यांची शिकार केली असून, उघड्या गोठ्यात बांधलेल्या जनावरांच्या जिवालाही मोठा धोका निर्माण झाला आहे.

नागरिक किंवा पशुधनाची कोणतीही जीवितहानी होण्यापूर्वी वन विभागाने तातडीने पिंजरा लावून या बिबट्याला जेरबंद करावे, अशी आग्रही मागणी माडीगुंजी येथील ग्रामस्थांनी गुंजी क्षेत्र वन अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन देतेवेळी सामाजिक कार्यकर्ते पंकज कुट्रे, रावजी बिर्जे यांच्यासह अनेक प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: