बेळगाव महापालिकेच्या ‘इ-जन्म’ विभागात जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी सर्वसामान्यांना महिनाभर ताटकळत ठेवले जात आहे, तर दलालांमार्फत दोन दिवसांत काम होत असल्याचा गंभीर करत प्रशासनाच्या या मनमानी कारभारावर नगरसेवक आणि नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

बेळगाव महापालिकेच्या इ-जन्म नोंदणी विभागात जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अर्ज सादर करून आठवडे उलटले तरी कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे समोर आले आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांना न मिळणारे दाखले दलालांमार्फत अवघ्या दोन दिवसांत उपलब्ध करून दिले जात असल्याचा गंभीर आरोप नगरसेवक मुजम्मिल डोणी यांनी केला आहे.

बेळगाव महापालिकेच्या इ-जन्म नोंदणी विभागात दाखले मिळवण्यासाठी नागरिकांना तीव्र अडचणींचा सामना करावा लागत आहे. अर्ज सादर करून २० ते २५ दिवस उलटल्यानंतरही कर्मचारी टाळाटाळ करत असल्याची तक्रार नागरिकांनी केली . वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसून नागरिकांना दररोज नवीन कारणे सांगून परत पाठवले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होताच नगरसेवक मुजम्मिल डोणी यांनी तातडीने मनपाला भेट देत विभागातील कर्मचाऱ्यांना धारेवर धरले.
बाळेकुंद्री, सांबरा यांसारख्या दूरच्या भागांतून येणारे नागरिक आणि ८२ वर्षांच्या वृद्धांनाही तासनतास ताटकळत राहावे लागत आहे. रुग्णालयाची सर्व आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज जमा करूनही अधिकारी दाद देत नाहीत. त्यामुळे रोजचे काम सोडून महापालिकेत हेलपाटे मारावे लागत असून वरिष्ठांनी यात हस्तक्षेप करून त्वरित दाखले वाटप करावेत, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली.
इ-जन्म नोंदणी विभागात किरकोळ दुरुस्तीसाठीही नागरिकांना कोर्टाचे फेरे मारायला लावले जात असल्याचे विरोधी नगरसेवक मुजम्मिल डोणी यांनी सांगितले. लोकप्रतिनिधी किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी विनंती केल्यास काम न करणारे कर्मचारी, दलालांमार्फत काम आल्यास अवघ्या दोन दिवसांत ते पूर्ण करून देतात, असा आरोप त्यांनी केला. कायद्याची अंमलबजावणी सर्वांसाठी समान असावी आणि दलालांचा सुळसुळाट रोखण्यासाठी लवकरच महापौरांसोबत बैठक घेऊन योग्य पावले उचलली जातील, असे मुजम्मिल डोणी यांनी म्हटले.


Recent Comments