Bailahongala

चिप्पलकाट्टी व चिकबागेवाडीत माकडांचा सुळसुळाट; नागरिक त्रस्त

Share

बैलहोंगल तालुक्यातील चिकबागेवाडी गावात गेल्या काही दिवसांपासून माकडांचा त्रास मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. घरांच्या छतांचे नुकसान करण्यासोबतच शेतातील पिकांची नासाडी होत असल्याने ग्रामस्थ व शेतकरी त्रस्त झाले आहेत.

माकडांच्या टोळ्यांमुळे घरांच्या छतावरील कौलांची तोडफोड होत असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर याचा परिणाम झाला आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

दुसरीकडे शेतात घुसून माकडे सोयाबीनसह इतर पिकांचे नुकसान करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून शेतात जाण्यासही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर तातडीने उपाययोजना करून माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वनविभागाकडे करण्यात येत आहे.

Tags: