Khanapur

नेपाळमध्ये हत्या झालेल्या खानापूरच्या युवकावर अंत्यसंस्कार गोव्याहून आणला मृतदेह

Share

नेपाळमध्ये निर्घृण हत्या झालेल्या खानापूर येथील साहील मोमीन या युवकाचा मृतदेह अखेर स्वगावी आणण्यात आला असून, आज सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

साहील मोमीन याचा मृतदेह काल रात्री १० वाजता गोवा विमानतळावर आणण्यात आला. तिथून खानापूरच्या आशिफ दफेदार, मलिक नाईक, रब्बानी बेपारी, इसाक खान पठाण, अजीज जमखंडी, यासीन दफेदार आणि शहाबाज बस्तवाडकर या युवकांच्या पथकाने रुग्णवाहिकेद्वारे मध्यरात्री ३ वाजता मृतदेह खानापुरात आणला.

आज सकाळी ९ वाजता खानापूर येथील स्थानिक कब्रस्तानात धार्मिक विधींनुसार साहीलचा दफनविधी पार पडला. यावेळी त्याचे नातेवाईक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: