Khanapur

खानापूर तालुका पंचायतीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा निरोप सोहळा संपन्न

Share

खानापूर तालुका पंचायतीच्या सभागृहात सेवानिवृत्त सहाय्यक संचालिका रूपाली बडकुंद्री व विविध ग्रामपंचायतींच्या पीडीओंचा निरोप आणि नूतन सहाय्यक संचालकांचा स्वागत सोहळा पार पडला.

खानापूर तालुक्यात जबाबदार अधिकारी म्हणून सेवा बजावलेल्या सहाय्यक संचालिका रूपाली बडकुंद्री यांच्यासह सेवानिवृत्त पीडीओ यशवंत घाडी (हेबबाळ), नारायण पाटील (जांबोटी), पुंडलिक हेब्बाळकर (बैलूर) व विठ्ठल देवलट्टी (कक्केरी) यांना शाल, पुष्पहार व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याच वेळी नूतन सहाय्यक संचालक शशीधर बेल्लारी यांचेही स्वागत करण्यात आले. तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी रमेश मेत्री यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.

सत्काराला उत्तर देताना रूपाली बडकुंद्री यांनी सहकाऱ्याщих सहकार्यामुळे कर्तव्य बजावणे सोपे झाले आणि खानापूरमधील सेवेचा अनुभव नेहमीच स्मरणात राहील, अशी भावना व्यक्त केली.

या प्रसंगी कार्यकारी अधिकारी रमेश मेत्री यांनी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवेचे व प्रामाणिकपणाचे कौतुक करून त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला पीडीओ अनंत भिंगे यांच्यासह तालुक्यातील प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Tags: