Khanapur

गर्लगुंजी :माऊली स्पोर्ट्स क्लबच्या नवीन जर्सीचे अनावरण

Share

खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी येथे माऊली स्पोर्ट्स क्लबच्या २०२६-२७ या वर्षातील क्रिकेट सामन्यांसाठीच्या नवीन जर्सीचे दिमाखात अनावरण करण्यात आले.

माचीगड, नंदगड, जांबोटी, हलसाल यांसह विविध ठिकाणी झालेल्या फुल पिच आणि हाफ पिच क्रिकेट स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावून या संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. या संघाला जर्सी प्रायोजित करणारे माजी ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते प्रसाद पाटील यांच्या हस्ते या जर्सीचे अनावरण करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना प्रसाद पाटील यांनी युवकांनी व्यसनाधीनतेपासून दूर राहून क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करावी आणि आपल्या गावाचे व तालुक्याचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन केले.

या कार्यक्रमाला पी.के.पी.एस सोसायटीचे उपाध्यक्ष विनोद कुंभार, अष्टपैलू खेळाडू प्रताप पाटील, परशराम आस्टेकर, कर्णधार सागर कोलेकर, पांडुरंग भातकांडे यांच्यासह खेळाडू यश चौगुले, हरीश चौगुले, योगेश पाटील, मल्लप्पा पाटील, निलेश निट्टूरकर, श्रेयश निट्टूरकर, मंथन पाटील, प्रणय यलारीचे, संदेश कोलेकर, गणेश पाखरे, भुजंग मेलगे, गंधर्व बिर्जे, दत्ता पाटील, दत्ता देसाई, एकलव्य प्रशिक्षक प्रशांत पाखरे, कल्लाप्पा लोहार आणि अनंत पाटील उपस्थित होते.

Tags: