शेडबाळ येथे शेतकऱ्यांच्या पुढाकाराने राबवण्यात येत असलेल्या ‘वरदा उपसा जलसिंचन योजनेचा’ शुभारंभ हंचिनाळ मठाचे महेशानंद स्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आला.


शेडबाळ येथे प्रगतशील शेतकरी रमेश चौगुले आणि सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या ‘वरदा उपसा जलसिंचन योजने’च्या मुख्य इनटेक टॅंकचे पूजन हंचिनाळ मठाचे पूज्य महेशानंद स्वामीजी यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी बोलताना स्वामीजींनी शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले.

केवळ नफ्यासाठी व्यावसायिक पिके न घेता, दैनंदिन गरजेची ज्वारी आणि भाज्या स्वतःच्या शेतात पिकवण्याचा सल्ला त्यांनी दिला; जेणेकरून विजापूर येथून ज्वारी खरेदी करण्याची वेळ येणार नाही. तसेच, दलालांकडून होणारी पिळवणूक रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतमालाचे दर स्वतः ठरवून स्वावलंबी व्हावे आणि तरुण पिढीने व्यसनांपासून दूर राहून कष्टाला प्रतिष्ठा द्यावी, असे प्रतिपादन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला कन्नड युवक संघाचे अध्यक्ष शिवगौडा कागे, शिरगुप्पी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अरुण परांडे, माजी जिल्हा पंचायत सदस्य अजित चौगुले, रवींद्र पुजारी, शेडबाळ नगर पंचायतीचे अध्यक्ष उत्कर्ष पाटील, दत्त साखर कारखान्याचे संचालक ज्योतिकुमार पाटील, सुभाष कठारे, भरत नांद्रे, राजाराम गडगे यांच्यासह कागवाड, शेडबाळ, उगार, कुसनाळ, मुळवाड व शिरगुप्पी परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.


Recent Comments