राज्य सरकारच्या महत्त्वपूर्ण आदेशामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सामान्यतः रविवारी सुटी असणारी उपनिबंधक (सब-रजिस्ट्रार) कार्यालये या आठवड्यात रविवारीही नियमितपणे सुरू राहणार आहेत.

कर्नाटक सरकारच्या अधिकृत आदेशानुसार, येत्या रविवारी म्हणजेच १२ जुलै २०२६ रोजी बेळगाव जिल्ह्यासह राज्यातील सर्व उपनिबंधक कार्यालये नेहमीप्रमाणे खुली राहतील आणि जनसामान्यांसाठी सेवा पुरवतील.

कर्नाटक नोंदणी नियम १९६५ च्या प्रकरणातील नियम ५ मधील दुरुस्तीनुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे. या सुधारित नियमांनुसार रविवारची सुटी रद्द करून तो दिवस ‘कामाचा दिवस’ म्हणून घोषित करण्यात आला आहे.
मालमत्ता नोंदणी, मुद्रांक शुल्क भरणे यासारख्या विविध तातडीच्या कामांसाठी नागरिक आणि ग्राहकांनी या विशेष संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महसूल विभागाच्या अधिकृत अधिसूचनेद्वारे करण्यात आले आहे.


Recent Comments