Belagavi

मंत्रीपदापेक्षा स्वाभिमान मोठा : आमदार अशोक पट्टण

Share

मंत्रीपदापेक्षा स्वाभिमान मोठा असून शेवटच्या श्वासापर्यंत राजकारण करणार असल्याचे रामदुर्गचे आमदार अशोक पट्टण यांनी स्पष्ट केले.

मंत्रीपदासाठी आपण कोणाच्याही मागे लागणार नसल्याचे सांगत, विरोधक आपल्याला कमजोर करण्यासाठी अपप्रचार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रकृती साथ देईपर्यंत आपण निवडणूक लढवणार असून, गरज पडल्यास पुतण्याला राजकीय संधी देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सिद्धरामय्या आणि मंत्री सतीश जारकीहोळी यांच्यात कोणतेही वाद नसून प्रसारमाध्यमेच त्यांच्यात भांडणे लावत असल्याचा आरोप पट्टण यांनी केला. योग्य वेळ आल्यावर मंत्रीपद देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिले असल्याचे सांगत, बेळगाव जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्याने जिल्ह्याला आणखी किमान तीन मंत्रीपदे मिळावीत, अशी मागणी त्यांनी केली.

Tags: