Kagawad

कृष्णा नदीवरील तीन पुलांचे काम ७ वर्षांनंतरही अपूर्ण

Share

कृष्णा नदीवरील तीन पुलांचे काम सात वर्षांनंतरही अपूर्ण असल्याने स्थानिक नागरिक, प्रवासी व शेतकऱ्यांमध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाविरोधात तीव्र असंतोष पसरला आहे.

२०१७ मध्ये मंजूर झालेल्या उगार-कुडची, जुगुळ-खिदरापूर आणि मुळवाड-चिंचली पुलांचे काम २०१८ मध्ये सुरू झाले होते. नियोजनानुसार हे पूल २०२२ पर्यंत पूर्ण होणे बंधनकारक असताना २०२६ उजाडले तरी रखडलेलेच आहेत. बंगळुरूच्या संबंधित कंपनीकडून कामात दिरंगाई होत असून, पुलांचे मध्यभागातील काम झाले असले तरी दोन्ही बाजूंचे जोडरस्ते अद्याप अपूर्ण आहेत.

दरवर्षी पावसाळ्यात उगार-कुडची मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प होते आणि वाहनधारकांना ६० किलोमीटरचा दळणवळणाचा फेरा मारावा लागतो. ही समस्या ठाऊक असूनही दुर्लक्ष केले जात असल्याने, पुलांचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याची मागणी स्थानिक करत आहेत.

Tags: