Belagavi

नवीन सरकार स्थापनेनंतर मुख्यमंत्र्यांकडून जिल्हावार परिस्थितीची पाहणी

Share

राज्यात नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील पाऊस आणि पिकांच्या सद्यस्थितीची पाहणी करण्यासाठी हा दौरा असून, सर्व आमदारांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बेळगावच्या सांबरा विमानतळावर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले की, राज्यातील पाऊस आणि पीक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्व विभागांचा दौरा केला जात आहे. याची सुरुवात बसवकल्याण येथून झाली असून बिदर आणि कलबुर्गी जिल्ह्यांचा दौरा करून आज बेळगावात आगमन झाले आहे.

या पाहणी दौऱ्यात सरकारच्या प्रमुख मंत्र्यांचाही सहभाग असून जिल्ह्यातील सर्व आमदारांना बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. आमदारांशी सविस्तर चर्चा करून सद्यस्थिती जाणून घेतली जाईल आणि त्यानंतर माध्यमांशीही संवाद साधला जाईल, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांचे सहकार्य मागितले.

Tags: