महाराष्ट्र आणि पश्चिम घाट परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रसिद्ध अंबोली घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. डोंगरावरून मोठी दरड रस्त्यावर आल्याने बेळगाव-वेंगुर्ला महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

पश्चिम घाटात पावसाचा जोर वाढल्याने बेळगाव-वेंगुर्ला राज्य महामार्गावरील अंबोली घाटात अचानक दरड कोसळली. सुदैवाने एसटी बस आणि इतर वाहने जात असतानाच काही अंतरावर ही दरड कोसळल्याने मोठा अनर्थ टळला असून प्रवासी सुरक्षित आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक बंद केली आहे.

सध्या जेसीबी यंत्रांच्या साहाय्याने रस्त्यावरील दगड आणि ढिगारा (मलबा) हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. घाटात आणखी दरड कोसळण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला असून, नागरिकांना या मार्गावरून प्रवास करताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Recent Comments