Uncategorized

बेळगावात रविवार पेठेत बसवेश्वर बँकेतर्फे स्वच्छता मोहीम

Share

केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘सहकार सप्ताहा’चे औचित्य साधून बेळगावातील श्री बसवेश्वर को-ऑपरेटिव्ह बँकेतर्फे रविवार पेठ परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

कर्नाटक सहकार विभाग आणि विविध सहकारी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडला. या मोहिमेदरम्यान बोलताना बँकेचे अध्यक्ष रमेश कळसन्नवर म्हणाले की, स्वच्छता ही केवळ कचरा काढणे नसून ती आपली जीवनसंस्कृती आहे. स्वच्छ पर्यावरणामुळेच निरोगी समाज निर्माण होतो. त्यामुळे नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा.

या उपक्रमात बँकेचे संचालक बी. व्ही. उप्पीन, एस. के. पाटील, एन. डी. झुंडद, जी. एस. खडबडी यांच्यासह बँकेचे कर्मचारी आणि महापालिकेचे स्वच्छता कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: