गेल्या आठ वर्षांपासून बसवेश्वर उपसा सिंचन योजनेचे काम रखडल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी अथणी येथील सिंचन विभाग कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच कालव्यांना त्वरित पाणी सोडण्याची मागणी केली.

या योजनेंतर्गत केवळ १० हजार हेक्टर क्षेत्राला पाणी देऊन विभागाने हात झटकले आहेत, असा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला. अरळीहट्टी गावातील १३ व्या क्रमांकाचा कालवा जमिनीच्या मोबदल्यावरून बंद असल्याने चार गावांतील ४ हजार हेक्टर शेती पाण्यापासून वंचित आहे.


सुमारे १०० हून अधिक शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा वाद मिटवण्याची मागणी केली. समस्या लवकर न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला असून, अधिकाऱ्यांनी यावर त्वरित योग्य पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.


Recent Comments